Join us

आलिया भटने बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत गुपचूप उरकलं लग्न?, मेंहदीचा फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 13:30 IST

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे,

आलिया भट आणिरणबीर कपूर हे त्यांच्या रिलेशनशिप आणि लग्नाला घेऊन अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर आणि मुलाखतीतही त्यांना लग्नाबाबत अनेकदा  प्रश्न विचारला जातो. पण दोघांपैकी एकानेही लग्नाबद्दल कधीच काही सांगितले नाही. सध्या आलियाचा वधूच्या गेटअपमधला फोटो सोशल मीडियावर फोटो समोर आला आहे. या फोटोवरुन रणबीर आणि आलियाने गुपचूप लग्न केलं का असा प्रश्न विचारला जातोय. फोटोत आलियाने एका हातावर मेंहदी लावलेली दिसतेय. मात्र आलियाने ही तयारी एका फोटोशूटसाठी केली होती.  सोशल मीडियावर मात्र हा फोटो जोरदार व्हायरल होतोय. आलिया आणि रणबीर बी-टाऊनमधल्या क्युट कपलपैकी एक आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षा कधी पासून करतायेत. 

सध्या आलिया बहिण शाहिन तसेच अनुष्का व आकांक्षा रंजन या मैत्रिणींसोबत आलिया मालदीव व्हॅकेशनवर गेली आहे. आलियाने या व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. आलियाचा बिकिनीमधला फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. 

आलियाच्या वर्कफ्रंट सांगायचे तर एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे तिने साईन केले आहेत. बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. करोना व्हायरसमुळे हा चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकलेला नाही.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर