Join us

"हे काहीतरी अविस्मरणीय...", रणबीर कपूरच्या 'रामायण'चा टीझर पाहून भारावली आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:56 IST

डोळ्यांचं पारणं फेडणारा 'रामायण'चा टीझर पाहून आलिया भटही थक्क झाली आहे. आलियाने तिच्या सोशल मीडियावरुन टीझर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

Ramayana First Teaser: नितेश तिवारींच्या रामायण सिनेमाच्या चाहते प्रतिक्षेत आहेत. या सिनेमाची पहिली झलक अखेर आज समोर आली.  'रामायण'  सिनेमाचा पहिला टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा टीझर पाहून आलिया भटही थक्क झाली आहे. आलियाने तिच्या सोशल मीडियावरुन टीझर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

'रामायण'च्या ३ मिनिटं ३ सेकंदांच्या टीझरमध्ये रामायण या महाकाव्याची जादूई सफर घडतेय. टीझरची सुरुवात होते ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्यापासून. या विश्वाचा समतोल ब्रह्मा (सृष्टीकर्ता),  विष्णू (पालक) आणि शंकर (संहारक) या त्रिकुटामुळे टिकून असतो. मात्र या संतुलनातूनच उगम होतो एका अनोख्या राक्षस बालकाचा जो पुढे रावण बनतो. त्याला थोपवण्यासाठी विष्णू स्वतः मानवाचा श्रीरामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर येतो, असं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. या टीझरच्या अगदी शेवटी प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर तर रावणाच्या भूमिकेत साउथ सुपरस्टार यश पाहायला मिळतोय. 

आलिया हा टीझर शेअर करत म्हणते, "काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात. हे पाहून असं वाटतंय की अविस्मरणीय गोष्टीची ही सुरुवात आहे. दिवाळी २०२६ ची वाट पाहतोय". रामायण सिनेमात रणबीर कपूर— श्रीरामांच्या भूमिकेत, यश — रावण या सशक्त भूमिकेत, साई पल्लवी— सीता, सनी देओल— हनुमान, रवी दुबे — लक्ष्मण अशा कलाकारांची फौज असणार आहे. २०२६च्या दिवाळीत या सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे. 

टॅग्स :रामायणरणबीर कपूरआलिया भट