Join us

‘आलिया-आदित्य’ करण जोहरची आगामी जोडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 13:32 IST

  सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ सोहळ्यात बॉलीवूडमधील अनेक कलाकार परफॉर्मन्स सादर करण्यासाठी पोहोचले आहेत. तिथे त्यांनी सादर केलेल्या ...

  सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ सोहळ्यात बॉलीवूडमधील अनेक कलाकार परफॉर्मन्स सादर करण्यासाठी पोहोचले आहेत. तिथे त्यांनी सादर केलेल्या  परफॉर्मन्सेसचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहेत.यावेळी आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट यांनी एकत्र प्रथमच परफॉर्मन्स केला. या जोडीकडे पाहिल्यावर दिग्दर्शक करण जोहरच्या डोक्यात लगेचच त्याच्या आगामी चित्रपटासाठी जोडी सापडल्याचा आनंद झाला असेल. आदित्य रॉय कपूर तर आलियासोबत काम करण्यासाठी तयार आहेच पण, आलियाही त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे.