Join us

​अली फझलच्या आगामी चित्रपटाला का होतोय उशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 20:01 IST

‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये करिअर सुरू करणारा अभिनेता अली फझल मागील काही दिवसांपासून लंडन येथे शूटिंगमध्ये व्यस्त ...

‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये करिअर सुरू करणारा अभिनेता अली फझल मागील काही दिवसांपासून लंडन येथे शूटिंगमध्ये व्यस्त होता. नुकतेच या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील शूटिंगसाठी तो आगरा येथे दिसला होता. मात्र, आता त्याने पुन्हा बॉलिवूड चित्रपट ‘फुकरे २’ चे दिल्लीमध्ये शूटिंग सुरू के ले असून, तो आणखी तीन महिने तो शूटिंगमध्ये व्यस्त राहणार असल्याचे कळते. यामुळे त्याच्या आगामी ‘तडका’ या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे. अली फझल मागील काही महिन्यापासून सतत काम करीत आहे. याची सुरूवात ‘हॅप्पी भाग जायेंगी’ या चित्रपटापासून झाली. यानंतर तो ‘तडका’ व ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश राज यांचा चित्रपट ‘तडका’ याला देखील उशीर होणार आहे. ‘तडका’मध्ये तो तापसी पन्नूच्या अपोझिट दिसणार आहे. मात्र आगामी चित्रपटांना दिलेल्या तारखांमुळे ‘तडका’ला उशीर होत आहे. ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुला’चे शूटिंग पूर्ण झाल्यावर त्याने ‘फुकरे २’ च्या शूटिंगला दिल्ली येथे सुरुवात केली. प्रकाश राज दिग्दर्शित करीत असललेल्या ‘तडका’ या चित्रपटातील काही दृष्यांचे शूटिंग मुंबईत करायचे आहे. ही दृष्ये प्रकाश राज व अली फझल यांच्यावर चित्रीत करायची असून, दिल्लीत सुरू असलेले फुकरेचे शूटिंग आणखी तीन महिने चालणार आहे. अलीच्या या नियोजित क ार्यक्रमामुळे तडकाचे काम थांबले असल्याचे सांगण्यात येते. दिल्लीचे शूटिंग पूर्ण झाल्यावर लगेच तो ‘तडका’चे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचा करार अली व प्रकाश राज यांच्यात झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांत सहमती झाली असली तरी तारखांचा घोळ होत असल्याने शूटिंग पूर्ण करण्यास अली असमर्थ आहे असेही सांगण्यात आले. ‘तडका’ हा चित्रपट नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित करण्याची योजना होती मात्र आता तो २०१७च्या मध्यात रिलीज होईल असे समजते.