अक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर माझी तर सोडाच, पण डॉक्टरांचीही चालत नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 21:22 IST
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारला चित्रपटांमध्ये रफ अॅण्ड टफ भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाता. त्याचबरोबर तो कुटुंबवत्सल असल्याचेही बºयाचदा बघावयास मिळाले. गेल्या ...
अक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर माझी तर सोडाच, पण डॉक्टरांचीही चालत नाही’
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारला चित्रपटांमध्ये रफ अॅण्ड टफ भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाता. त्याचबरोबर तो कुटुंबवत्सल असल्याचेही बºयाचदा बघावयास मिळाले. गेल्या काही दिवसांमध्ये ट्विंकल आंतरराष्टÑीय माध्यमांमध्ये झळकत होती. बीबीसीने ट्विंकल खन्नाशी सेनेटरी नॅपकिनवर चर्चा केली होती. याविषयी अक्षयने सांगितले की, ‘ट्विंकल केवळ वक्तव्य करते तर माध्यमांमध्ये चर्चेत येते, घरी काय होत असेल याचा तुम्हाला अंदाजही लावता येणार नाही.’ पुढे बोलताना अक्षय म्हणतो की, वास्तविक तिचा प्रत्येक दिवस चांगला उगवतो. प्रत्येक दिवशी काही ना काही शिकण्यास मिळते, कारण माझी पत्नी वाचन खूप करते. त्यामुळे तिच्याकडे माहितीचा साठा भरपूर आहे. एक प्रसंग सांगताना अक्षय म्हणतो की, आम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा तेदेखील काही बोलू शकत नाहीत. कारण डॉक्टर जेव्हा बोलतो तेव्हा ती म्हणते ‘सुनो...’ एवढेच नाही तर ट्विंकल डॉक्टरशी बोलताना अशा शब्दांचा वापर करतेय जे ऐकून डॉक्टर दडपणाखाली येतो. कारण मी बºयाचदा डॉक्टरच्या चेहºयावरील भीती बघितली आहे. एकदा तर डॉक्टरांनी मला म्हटले होते की, ‘अक्षय... एकटा येत जा... तुझ्या पत्नीला सोबत घेऊन येऊ नकोस.’ अक्षयने हा किस्सा एका इव्हेंटदरम्यान सांगितला होता. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘गोल्ड’ आणि ‘केसरी’मध्ये बघावयास मिळणार आहे. ‘गोल्ड’मध्ये अक्षय एका महान खेळाडूची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. तर ‘केसरी’ या चित्रपटात तो एक दमदार भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत त्याच्या या चित्रपटाचे दोन पोस्टर्स प्रदर्शित झाले आहे. ज्यामध्ये अक्षय केसरी रंगाच्या कपड्यांमध्ये पगडी घालून दिसत आहे.