अक्षयच्या ‘रुस्तम’मधील नौदल पोशाखात आहेत अनेक चुका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 18:17 IST
अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ अलीकडेच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीतही उतरला. गाजलेल्या नानावटी हत्याकांडावर आधारित या चित्रपटात अक्षयने एका नौदल ...
अक्षयच्या ‘रुस्तम’मधील नौदल पोशाखात आहेत अनेक चुका!!
अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ अलीकडेच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीतही उतरला. गाजलेल्या नानावटी हत्याकांडावर आधारित या चित्रपटात अक्षयने एका नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नौदलाच्या पांढऱ्या शुभ्र रूबाबदार पोशाखातील अक्षय या चित्रपटात भाव खावून जातो. पण काय तुम्हाला माहितीयं, अक्षयने चित्रपटात परिधान केलेल्या नौदलाच्या या पोशाखात अनेक चुका झालेल्या आहेत. खरे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयने परिधान केलेल्या पोशाखातील चुका जगासमोर याव्यात, हे एक कोडे आहे. निश्चितपणे या चुका चित्रपट रिलीज झाल्यानंतर जगापुढे आल्या, हे अक्षयचे नशीब मानायले हवे. कारण चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चुका लोकांच्या ध्यानात आल्या असत्या तर कदाचित चित्रपटाच्या बॉक्स आॅफिस कलेक्शनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाढली असती. असो, शेवटी हा जर-तरचा विषय. तूर्तास अक्षयने चित्रपटात परिधान केलेल्या पोशाखात कुठल्या चुका आहेत, हे तुम्हीच बघा!! }}}}