Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयच्या बॉडीगार्डने चाहत्याला भणकावली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 10:20 IST

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते काय कमी आहेत का? हे तर आपल्याला माहितीच आहे. सध्या तो ‘रूस्तुम’ आणि ‘ हाऊसफुल्ल ३’ च्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते काय कमी आहेत का? हे तर आपल्याला माहितीच आहे. सध्या तो ‘रूस्तुम’ आणि ‘ हाऊसफुल्ल ३’ च्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.सेलिब्रिटी दिसल्यानंतर फॅन्स काय केवळ पाहत थोडेच बसणार आहेत? तर ते त्यांच्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न करतच असतात. काही वेळांपूर्वी मुंबई एअरपोर्टवरून अक्षय कुमार भक्कम सुरक्षारक्षकांसह येत होता.तेव्हा त्याचा एक चाहता तिथे येऊन त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्या चाहत्याच्या गालावर त्या बॉडीगार्डने भणकावून दिली. तो चाहता लगेचच बाजूला गेला. आणि अक्षय कुमारसह तो संपूर्ण जत्था पुढे निघून गेला.वेल, अक्षय तुझ्याकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती. या घटनेने केवळ तो एकच चाहता नव्हे तर संपूर्ण तुझा चाहतावर्ग नाराज होणार आहे.">http://