Join us

"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

By देवेंद्र जाधव | Updated: May 17, 2025 14:00 IST

ओशो आश्रमात गेल्यावर विनोद खन्नांनी काय केलं? याविषयी अक्षय खन्नाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. ही गोष्ट तुम्ही याआधी वाचली नसेल

'छावा' सिनेमा रिलीज झाला आणि अक्षय खन्नाच्या (akshaye khanna) अभिनयाचं खूप कौतुक झालं. अक्षयने 'छावा' सिनेमात साकारलेली औरंगजेबाची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने पुन्हा एकदा त्याचं अभिनयकौशल्य सर्वांना दाखवून दिलं. अक्षयचे बाबा विनोद खन्नाही (vinod khanna) सुप्रसिद्ध अभिनेते होते. विनोद खन्नांनी करिअरच्या शिखरावर असताना ओशो आश्रमात जाऊन बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. त्याविषयी अक्षय एका मुलाखतीत व्यक्त झाला.

अक्षय खन्नाचा वडिलांविषयी खुलासा 

अक्षय खन्नाने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. अक्षय खन्ना म्हणाला होता की, "माझा पदार्पणाचा सिनेमा चालला नव्हता पण ठीक आहे. माझे वडील अभिनेते होते तर मी सुद्धा अभिनयक्षेत्रामध्ये आलो. माझे वडील जेव्हा अमेरिकेतील ओशो आश्रमात गेले होते तेव्हा त्या आश्रमात त्यांनी काम काय केलेलं माहित आहे का? बाबा ओशो आश्रमात माळीकाम करायचे. आश्रम असल्याने काही लोक किचन सांभाळायचे, काही गार्डनमध्ये काम करायचे तर काही लोक ड्रायव्हर झाले. प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं काम असायचं. त्यामुळे वडील तिथे माळीकाम करायचे." अशाप्रकारे अक्षय खन्नाने वडीलांविषयी खुलासा केला. 

विनोद खन्ना गेले होते ओशो आश्रमात

अक्षय खन्नाचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना १९८० च्या सुरुवातीला बॉलिवूडला रामराम ठोकला. विनोद खन्ना अमेरिकेतील ओशो आश्रमात जाऊन त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला. अमेरिकेतील ओरिगॉन येथील रजनीशपुरम आश्रमात विनोद खन्ना गेले होते. वैवाहिक समस्या आणि दारुचं व्यसन इत्यादी गोष्टींचा विनोद खन्ना यांना त्रास व्हायचा. ओशो आश्रमात जाऊन विनोद खन्ना संन्यासी झाले. त्यानंतर १९८० च्या अखेरीस विनोद खन्ना पुन्हा परतले. त्यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलाच शिवाय राजकारणातही सहभाग घेतला. 

अक्षय खन्नाच्या करिअरमध्ये विनोद खन्नांचा मोठा वाटा आहे. अक्षयने विनोद खन्नांकडून अभिनयाचे धडे गिरवले. 'हिमालय पुत्र' हा अक्षयचा बॉलिवूड डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात विनोद-अक्षय या बाप-लेकाच्या जोडीने एकत्र काम केलं होतं. २०२५ मध्ये अक्षयने 'छावा' सिनेमातून त्याची अभिनयक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. आता लवकरच अक्षय 'धुरंधर' या बॉलिवूड सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्तसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :अक्षय खन्नाविनोद खन्नाअमेरिकाअमेरिकाबॉलिवूड'छावा' चित्रपट