Join us

अक्षयकुमार पत्नी ट्विंकल खन्नाच्या नव्हे तर ‘या’ सौंदर्यवतीच्या इशाऱ्यावर नाचतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 18:42 IST

अक्षयकुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात त्याच्याबद्दलची एक बातमी समोर येत असून, त्यात त्याच्याविषयी एक खुलासा करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा ‘रुस्तम’ हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला होता, शिवाय या चित्रपटासाठी अक्षयला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता अक्षय त्याच्या ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणाºया ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या रिलीजची तयारी करीत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रतीक्षा लागून आहे. अक्षयच्या या दोन चित्रपटांविषयी सांगायचे कारण म्हणजे या दोन्ही चित्रपटांची निर्माती एकच आहे. होय, प्रेरणा अरोराने या दोन्ही चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रेरणाला बॉलिवूडची ब्यूटी विद माइंड असे म्हटले जाते. मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देण्यास प्रेरणा तरबेज आहे. तिने अक्षयकुमारसोबत ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या सुपरहिट चित्रपटामध्येही काम केले. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरू नये की, अक्षयकुमार त्याची पत्नी ट्विंकल खन्ना व्यतिरिक्त प्रेरणाच्या इशाºयावर नाचत नसेल?कृअर्ज एंटरटेन्मेंटची निर्माती असलेल्या प्रेरणाची आगामी दिवसांमधील लाइनअप सॉलिड आहे. तिचा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. त्यानंतर जॉन अब्राहम अभिनित ‘परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण’, ‘फन्ने खां’  आणि ‘केदारनाथ’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, प्रेरणाचे इंडस्ट्रीमधील स्थान काय असेल? प्रेरणाला कॅमेºयासमोर येणे पसंत नाही. त्याचबरोबर ती दिग्दर्शन करण्याचेही कधी धाडस करीत नाही. त्यामुळे तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आजवर तिने बॉलिवूडमध्ये ‘रुस्तम’ आणि ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या दोनच चित्रपटांवर काम केले असून, हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट राहिले आहेत. त्याचबरोबर आगामी काळातील तिचे प्रोजेक्ट पाहता इंडस्ट्रीत तिचे स्थान आणखी बळकट होईल, यात शंका नाही.