Join us

अक्षय कुमारचा Throwback व्हिडीओ चार तासात आठ लाख वेळा बघितला; तुम्ही बघितला काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 17:57 IST

​अभिनेता अक्षय कुमारची ही बाब सगळ्यांनाच माहीत आहे की, बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर त्याने कुकिंगपासून ते मार्शल आर्टमध्ये नशीब आजमावले आहे.

अभिनेता अक्षय कुमारची ही बाब सगळ्यांनाच माहीत आहे की, बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर त्याने कुकिंगपासून ते मार्शल आर्टमध्ये नशीब आजमावले आहे. त्यामुळेच तो त्याच्या सिनेमातील स्टंट्स स्वत:च करीत असतो. अक्षयने गेल्या गुरुवारी असेच काहीसे स्टंट असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला अन् हा व्हिडीओ लाखो फॅन्सनी बघितला. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केलेला हा व्हिडीओ केवळ चारच तासांत आठ लाख वेळा बघितला गेला.  व्हिडीओमध्ये अक्षय स्टेजवर किक बॉक्सिंग करताना बघावयास मिळत असून, त्यात त्याचा पंच मारण्याचा स्पीड हैराण करणारा आहे. या व्हिडीओला पोस्ट करताना अक्षयने लिहिले की, ‘तुमचा पंच मारण्याचा स्पीड तुमच्या टायमिंग स्पीडपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो’. अक्षयच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जॉली एलएलबी-२’ सिनेमाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. भारतीय न्यायवस्थेचा चेहरा दाखविणाºया या सिनेमात अक्षय कुमारने जगदीश्वर मिश्रा ऊर्फ जॉली नावाच्या वकिलाची भूमिका साकारली होती. अक्षयसोबत या सिनेमात हुमा कुरैशी, अनू कपूर आणि सौरभ शुक्ला यांच्या महत्त्वाच्या भूमिका बघावयास मिळाल्या. नुकताच अक्षयने ‘नाम शबाना’ची त्याची सहअभिनेत्री तापसी पन्नू हिच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो तिला आत्मसंरक्षणाचे धडे देताना बघावयास मिळाला. यावर्षी अक्षय सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘२.०’ या सिनेमात निगेटिव्ह भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर तो भूमी पेडनेकर हिच्यासोबत ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या सिनेमातही बघावयास मिळणार आहे. हा सिनेमा २ जून रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, अक्षय त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत असतानाच त्याच्या या व्हिडीओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या या व्हिडीओने सध्या धूम उडवून दिली असून, नेटिझन्सकडून तो जबरदस्त बघितला जात आहे. खरं तर अक्षय सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या व्हिडीओमुळे तर कधी त्याच्या आगामी सिनेमांमुळे.