Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारच्या फिलहाल 2 मोहब्बत गाण्याने रचला नवा रेकॉर्ड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:17 IST

फिलहाल 2 ने केवळ 3 दिवसात 100M व्ह्यूज मिळवले आहे ,जो एक नवीन विक्रम आहे. हे युट्यूबच्या इतिहासात, पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले जाणारे पहिले भारतीय गाणे ठरले आहे.

2019 मध्ये रिलीज झालेल्या फिलहाल गाण्याच्या पहिल्या भागालाही प्रचंड पसंती मिळाली होती. या गाण्याने इतकी पसंती मिळवली होती. की नवीन  विक्रम नोंदवले होते, जे यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्युज मिळवणा-या भारतातील गण्यांपैकी एक गाणे ठरले होते.फिलहालच्या प्रचंड यशानंतर अक्षय कुमार आणि नुपूर सेनन यांचा 'फिलहाल 2 मोहब्बत' हा सिक्वेल ही नुकताच रिलीज करण्यात आला होता. हे गाणे मंगळवारी ऑनलाइन रिलीज करण्यात  आले होते.

रिलीजच्या अवघ्या काही तासातच  सोशल मीडियावर या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घालायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रंचड पसंती दिली. इतकेच काय तर गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर  ट्रेंड होत होते.

 

फिलहाल 2 ने केवळ 3 दिवसात 100M व्ह्यूज मिळवले आहे ,जो एक नवीन विक्रम आहे. हे युट्यूबच्या इतिहासात, पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले जाणारे पहिले भारतीय गाणे ठरले आहे. सिक्वेल ने स्वतःच्याच प्रीक्वेलच्या पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड मोडला आहे. बी प्राक यांनी गायलेले आणि जानी यांनी लिहिलेले हे हृदयस्पर्शी गाणे सगळ्या म्युझिक चार्टवर पसंतीस पात्र ठरत आहे. 

तसेच काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी पोस्टर रिलीज केले आणि त्याचा सिक्वेल जाहीर केला होता आणि तेव्हापासून फिलहाल २ गाण्याची प्रचंड चर्चा रंगत होती. नवीन गाण्याची झलक दाखवणारे टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग 1 नंबरवर होते.

टॅग्स :अक्षय कुमार