बॉलिवूडच्या या खानने अक्षय कुमारला दाखवला चित्रपटातून बाहरेचा रस्ता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:00 IST
गुलशन कुमार यांच्यावर बायोपिक तयार करण्याची ज्यावेळी घोषणा करण्यात आली होती त्यावेळी या भूमिकेसाठी अक्षय कुमरच्या नावाची निवड करण्यात ...
बॉलिवूडच्या या खानने अक्षय कुमारला दाखवला चित्रपटातून बाहरेचा रस्ता ?
गुलशन कुमार यांच्यावर बायोपिक तयार करण्याची ज्यावेळी घोषणा करण्यात आली होती त्यावेळी या भूमिकेसाठी अक्षय कुमरच्या नावाची निवड करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांनी अक्की या चित्रपटापासून लांब गेलेला दिसला. त्यानंतर लगेच अक्षयने यासर्व गोष्टी फेटाळून आपणच मोगुलमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले. मात्र बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा अक्षयने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार अक्षय कुमारने फक्त चित्रपटात काम करण्यास नकार दिला नाहीय तर टी-सिरिजचे पैसे देखील परत केले आहेत. जे त्याला चित्रपट साईन करताना देण्यात आले होते. डीएनएला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याचित्रपटात आमिर खान प्रोड्यूसर म्हणून सहभागी झाला आहे. आता तो या चित्रपटात काम करताना दिसणार की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेला मोगुल चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करतायेत. ज्यांनी अक्षय कुमारच्या जॉली एल.एल.बी. 2 चे दिग्दर्शन केले होते. जर या चित्रपटात आमिर खानने अभिनय केला तर सुभाष कपूर आणि आमिर पहिल्यांदा एकत्र काम करतील. अक्षय कुमारचा पॅडमन चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. आधी हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र बॉक्स ऑफिसवरील क्लैशेस टाळण्यासाठी अक्षय कुमाराने चित्रपटाची डेट पुढे ढकलली. ALSO READ : 'पॅडमॅन' सिनेमा प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, आता या तारखेला होणार प्रदर्शित