Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, 'राम सेतु'चे पोस्टर्स आले समोर

By तेजल गावडे | Updated: November 14, 2020 17:45 IST

अभिनेता अक्षय कुमारने आणखी एक नवीन चित्रपट साइन केला आहे. लवकरच तो राम सेतूमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार इंडस्ट्रीतील सर्वात बिझी स्टार आहे. नुकताच अक्षय कुमारचा लक्ष्मी चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. दरम्यान आता दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयने आणखी एक नवीन सिनेमा साइन केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे राम सेतु. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार असून या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. यात अक्षय कुमार एका सामान्य माणसासारखा दिसतो आहे मात्र बॅकग्राउंडला प्रभू श्रीरामाचे पोस्टर पहायला मिळतंय.

अक्षय कुमारने राम सेतुबद्दल सांगत लिहिले की, या दिवाळीला. भारत राष्ट्रातील आदर्श आणि महानायक प्रभू श्रीराम यांच्या पुण्य स्मृतींना कित्येक युगांपर्यंत भारताच्या संवेदनात सुरक्षित ठेवण्यासाठी असा एक सेतू बनवला आहे जो आगामी पिढींना रामाशी जोडून ठेवेल. याच प्रयत्नात आमचादेखील एक छोटा संकल्प आहे राम सेतु. तुम्हाला सर्वांना दिवाळी शुभेच्छा.

राम सेतु चित्रपटाची अरूण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा सहनिर्मिती करत आहेत. क्रिएटिव्ह निर्माते डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी आहेत. राम सेतुचा पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी अक्षयचे चाहते उत्सुक आहेत.

अक्षय कुमारचा नुकताच लक्ष्मी चित्रपटा रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमारकियारा अडवाणी