Join us  

ओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 6:41 PM

बॉलिवूडच्या स्टारने त्याच्या बालपणीचा फोटो एका सामाजिक गोष्टीसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. चित्रपटाच्या प्रमोशनाव्यतिरिक्त अक्षय विविध सामाजिक मुद्देदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच अक्षय कुमारची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका खास कारणासाठी त्याची निवड केली आहे. हे कारण काय असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. खरंतर मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ट्विंकलनं अक्षय कुमारला नॉमिनेट केलंय. एवढंच नाही तर त्याला त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करायला सांगितला आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर त्याचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या घरात सायकलवर बसलेला दिसतो आहे. खरंतर या फोटोतून अक्षय कुमार ओळखता येत नाही आहे. हा फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिलं की, जेव्हा मी मोठा होत होतो त्यावेळी मला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता आणि माझी आई मला घरचं स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ बनवून द्यायची कारण माझे पॅशन मी पूर्ण करू शकेन. मात्र देशातील ११, ७२, ६०४ मुलांना एक वेळचंही जेवण मिळत नाही. आता वेळ आली आहे विचारायची #WhyTheGap"

अक्षयने या पोस्टसोबत मिशन मंगल चित्रपटातील सहकलाकार विद्या बालन, तापसी पन्नू व सोनाक्षी सिन्हा यांना नॉमिनेट केलं आहे.

या मोहिमेची सुरूवात सेव्ह दी चिल्ड्रन इंडियाने केली आहे. या संस्थेची ट्विंकल खन्ना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना