Join us

आईला वाढदिवशी कॅसिनोमध्ये घेऊन गेला अक्षय कुमार, पण कॅसिनोच का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 13:23 IST

अक्षयने आईला दिले खास सरप्राईज...

ठळक मुद्दे या वर्षांत लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी, पृथ्वीराज आणि बच्चन पांडे असे अक्षयचे चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी अभिनेता आहे. पण तरीही तो सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफशी संबंधित अनेक पोस्ट तो शेअर करत असतो. नुकताच अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तो त्याच्या आईसोबत वेळ घालवताना दिसतोय.अक्षय आईला तिच्या वाढदिवशी सिंगापूरच्या कॅसिनोमध्ये घेऊन गेला. कॅसिनोच का? याचे उत्तरही त्याने दिले.

कॅसिनो माझ्या आईची सगळ्यांत आवडते ठिकाण आहे, असे त्याने सांगितले. ‘जे काम करताना आनंद मिळतो, ते काम हटकून करा. माझ्या बर्थ डे गर्लनेही हेच केले. मी गेला आठवडा सिंगापूरमध्ये घालवला आणि माझ्या आईला तिच्या सर्वात आवडत्या ठिकाणी घेऊन गेलो, ते म्हणजे कॅसिनो,’असे हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयने लिहिले आहे. या व्हिडीओ अक्षयची आई व्हिलचेअरवर आहे आणि तिला कॅसिनोमध्ये घेऊन जातोय.

अक्षय हा उत्तम अभिनेता आहेच. सोबतच  एक खूप चांगली व्यक्तीही आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर तो नेहमीच आवाज उठवत असतो. अक्षय त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो नेहमीच त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो. त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर अनेकवेळा आपल्याला त्याच्या कुटुंबियातील मंडळींचे फोटो पाहायला मिळतात. 

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, 2019 हे वर्ष अक्षयसाठी ब्लॉकबस्टर ठरले. गतवर्षी त्याचे चार सिनेमे रिलीज झालेत आणि या चारही चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. अलीकडे रिलीज झालेला अक्षयचा ‘गुड न्यूज’ या सिनेमाने तर 200 कोटींचा पल्ला गाठला. या वर्षांतही लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी, पृथ्वीराज आणि बच्चन पांडे असे त्याचे चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

टॅग्स :अक्षय कुमार