Join us

14 फ्लॉप सिनेमा देणारा हा अभिनेता आज बॉलिवूडमध्ये आहे अव्वल, देतो सलमान, शाहरुख, आमिरला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:54 IST

नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे

अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. रोमाँटीक, अॅक्शन, कॉमेडी, देशभक्ती अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमा अक्षयने आपल्या करिअरमध्ये केले आहेत. अक्षयचे नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे.    

खूप कमी लोकांना माहिती आहे की, अक्षय कुमारचा इथेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. आजतकच्या रिपोर्टनुसार अक्षयने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सांगितले की, आपल्या करिअरमधील कठीण काळातील आठवणी जागवताना तो म्हणाले माझे 14 सिनेमा फ्लॉप झाले होते त्यानंतर एक अभिनेता म्हणून माझं करिअर संपले असे मला वाटू लागले. मला हरल्या सारखं वाटत होते. त्यावेळी माझी मार्शल आर्टची ट्रेनिंग माझ्या कामी आली. त्याने मला नियमात राहणं शिकवले. 14 फ्लॉप झालेल्या सिनेमांनी देखील मला खूप काही शिकवले.   

गेल्या 25 वर्षांपासून अक्षय सिल्वर स्क्रिनवर राज्य करतोय. वर्षाला जवळपास 3 ते 4 सिनेमा अक्षय देतो. सिनेमा कॉमेडी असो वा देशभक्तीवर आधारित प्रत्येक ठिकाणी अक्षय आपल वेगळी छाप सोडायला विसरत नाही.  मैं खिलाडी तू अनाडी, मोहरा, सबसे बडा खिलाडी, मिस्टक एंड मिसेज खिलाडी आणि खिलाडियों का खिलाडी असे अनेक हिट सिनेमा त्यांनी दिले आहेत.  

टॅग्स :अक्षय कुमार