सलमान खानमुळे मौनी रॉयला मिळाला अक्षय कुमारा 'गोल्ड' चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 15:04 IST
सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेकांचे करिअर बनवले आहे. सूरज पंचोली, डेजी शाह, यूलिया वांतूर आणि अथिया शेट्टी या कलाकारांना सलमानचे ...
सलमान खानमुळे मौनी रॉयला मिळाला अक्षय कुमारा 'गोल्ड' चित्रपट
सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेकांचे करिअर बनवले आहे. सूरज पंचोली, डेजी शाह, यूलिया वांतूर आणि अथिया शेट्टी या कलाकारांना सलमानचे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या यादीत आता आणखीन एक नाव सामील झाले आहे. ते म्हणजे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय हिचे. मौनीने सलमानच्या सांगण्यावरुन गोल्ड चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. ज्यानंतर अक्षय कुमारने मौनीला गोल्डसाठी साईन केले. मौनी आणि सलमानची ओळख 'बिग बॉस10'च्या मंचावर झाली होती. वेळोवेळी तो तिची बिग बॉसच्या मंचावर स्तुतीदेखील करायचा. मौनीने 2-3 वेळा सलमान सोबत स्टेजवर परफॉर्मन्ससुद्धा दिला आहे. आपल्या वाढदिवसाला देखील सलमानने तिला आमंत्रित केले होते. सलमान मौनीला बॉलिवूडमध्ये लाँच करणार हे आधीच कळले होते. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की रेमो डिसोझा दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटातून मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा डान्सवर आधारित चित्रपट आहे ज्यासाठी सलमान खान वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचे धडे गिरवतो आहे. यात आता सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. सलमान या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरु करणार आहे. ALSO READ : मौनी रायला मिळणार बॉलिवूडचे तिकिट! भाईजान सलमान खान करणार लॉन्च!!गोल्ड चित्रपटाची शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे.जिथे अक्षय कुमार, मौनी रॉयसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित आहे. चित्रपटाची कथा भारतीय हॉकी संघावर आधरित आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने तीनेळा ऑलिम्पिंकमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.15 ऑगस्टला 2018ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.