Join us

​‘टॉयलेट’वर भरभरून बोलला अक्षय कुमार! तुम्हीही वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:20 IST

सध्या अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या शीर्षकामुळे या चित्रपटात नेमके ...

सध्या अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या शीर्षकामुळे या चित्रपटात नेमके काय असेल, याबद्दल लोकांना उत्सूकता आहे. खरे तर ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटात अक्षय कुमार काम करणार, याचे त्याच्यापेक्षा त्याच्या चाहत्यांनाच अधिक टेन्शन आले होते. या चित्रपटाच्या शीर्षकात ‘टॉयलेट’ आहे, असा चित्रपट अक्षयने का स्वीकारला असेल? असा प्रश्न या चाहत्यांना पडला होता. बरं, स्वीकारला तर स्वीकारला पण किमान त्याचे नाव तरी बदलायचे, असेही अनेकांना वाटून गेले होते. विशेष म्हणजे, खुद्द अक्षयला अनेकांनी या चित्रपटाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. त्याचे अनेक जवळचे लोक, मित्र या चित्रपटाचे नाव ऐकत आणि मग हे नाव बरोबर का? म्हणून कन्फर्म करत.   हे नाव बदल यार, असा सल्ला अक्षयला अनेकांनी दिला. पण अक्षय तो! त्याने हा सल्ला मनावर घेण्याचे काहीही कारण नव्हते. कारण या नावात काहीही वाईट आहे, असे त्याला वाटत नव्हते.ALSO READ :  ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’मध्ये बहरणार केशव अन् जयाची लव्हस्टोरी!​या कारणामुळे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी दिला नच बलियेसाठी नकारअक्षय याबद्दल सांगतो,‘मी या चित्रपटाची घोषणा केल्यावर माझ्या जवळच्या मित्रांनी माझे मत बदलण्याचे बरेच प्रयत्न केले. तू अशा नावाचा चित्रपट स्वीकारलाच कसा? हा प्रश्न विचारून त्यांनी मला वैतागून सोडले. पण मी ठाम होतो. मी हे नाव जाणीवपूर्वक ठेवले. या विषयावर लोकांनी बोलावे, असे मला वाटते. भारतातील लोक ‘टॉयलेट’ या विषयावर बोलायला लाजतात. काहीही होवो, पण यावर बोलायला संकोचतात. कदाचित याचमुळे हायजीन अर्थात स्वच्छतेच्या बाबतीत आपण संकुचित आहोत. भारत अद्यापही सर्वाधिक कमी शौचालय वापरणारा देश आहे. टॉयलेट असूनही लोक उघड्यावर शौचास जातात. यामुळे भारतातील हजारो मुले डायरियाचे शिकार ठरतात. मला या विषयाला वाचा फोडायची होती. म्हणून  हे नाव मला बदलायचे नव्हते.’व्वा, अक्षयचा हा हेतू खरोखरच अपील होणारा आहे. आता अक्षयने ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट का निवडला?, याचे उत्तर तुम्हाला मिळालेच असेल.