Join us  

‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा आहे, मग पाहा अक्षय कुमारचा हा अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 3:32 PM

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमार आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी यांचा ‘सूर्यवंशी’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरु आहे आणि याचदरम्यान या चित्रपटाचा एक मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे.

ठळक मुद्दे‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएफ अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमार आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी यांचा ‘सूर्यवंशी’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरु आहे आणि याचदरम्यान या चित्रपटाचा एक मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार खतरनाक स्टंट करताना दिसतोय. रोहित शेट्टीचा सिनेमा म्हटल्यानंतर गाड्यांचे स्टंट असणारच. या मेकिंग व्हिडीओमध्ये त्याची झलक पाहायला मिळतेय.

स्वत: अक्षयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ ज्या दिवसापासून अ‍ॅक्टिंगची सुरुवात केली, त्यादिवसापासून अ‍ॅक्शन माझी लाईफलाईन बनली. ‘सूर्यवंशी’मध्ये कुठल्याही कटशिवाय मला अ‍ॅक्शन करताना पाहून’ आजही अ‍ॅक्शनबद्दल माझ्या मनात किती आग आहे, हे तुम्हाला कळले असेलच,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयने लिहिले आहे.54 सेकंदांच्या या व्हिडीओत अक्षय कधी कारचा पाठलाग करताना दिसतोय तर कधी चॉपरवर लटकताना दिसतोय.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएफ अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल.  पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा  होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता.

‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता. 

टॅग्स :सूर्यवंशीअक्षय कुमार