Join us

अक्षय कुमार म्हणतो, माझी ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन नव्हे ट्विंकलच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 21:37 IST

​बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले की, पत्नी ट्विंकल खन्ना हिच माझी ‘मस्त मस्त गर्ल’ असून, कायम तिच राहणार आहे. अक्षयच्या हस्ते गेल्या सोमवारी, ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ या गाण्याच्या रिमिक्सचे लॉन्चिंग करण्यात आले.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले की, पत्नी ट्विंकल खन्ना हिच माझी ‘मस्त मस्त गर्ल’ असून, कायम तिच राहणार आहे. अक्षयच्या हस्ते गेल्या सोमवारी, ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ या गाण्याच्या रिमिक्सचे लॉन्चिंग करण्यात आले. आगामी ‘मशीन’ या सिनेमात हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. अक्षयला जेव्हा त्याच्या मस्त मस्त गर्लविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने ट्विंकल असल्याचे सांगितले. या गाण्यात मुस्तफा आणि कियारा आडवाणी यांचा जबरदस्त डान्स दाखविण्यात आला. १९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘मोहरा’ या सिनेमात अक्षय आणि रवीना टंडन यांनी या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स करून धूम उडवून दिली होती. यावेळी अक्षयला रवीनासोबत केलेल्या कामाच्या अनुभवाविषयीदेखील विचारण्यात आले. अक्षयनेदेखील दिलखुलासपणे गप्पा मारताना २२ वर्षांपूर्वीचे अनुभव शेअर केले. तो म्हणाला की, २२ वर्षांपूर्वी जे काही घडले हे जरी संपूर्ण लक्षात नसले तरी, रवीनासोबत काम करणे माझ्यासाठी एकप्रकारचा सन्मानच होता. आम्ही बºयाचशा सिनेमांमध्ये एकत्र काम केले. ‘टिप-टिप बरसा पानी’ हे आजही माझे फेव्हरेट सॉँग आहे. त्यावेळी अक्षय कुमार आणि रवीना टंडन त्यांच्यातील संबंधांमुळे चांगलेच चर्चेत होते. या कार्यक्रमात अक्षयने ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ या त्याच्या जुन्या गाण्यावर डान्सही केला. तसेच रवीनाचे त्याने कौतुकही केले. तो म्हणाला की, रवीनासोबत केलेले बरेचसे सिनेमे हिट ठरले आहेत. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच होता. यावेळी अक्षयने या गाण्याच्या काही आठवणी सांगताना म्हटले की, रवीनासोबत या गाण्यासाठी रिहर्सल करताना खूपच किस्से घडायचे. अक्षयने म्हटले की, मला मिळालेल्या ‘खिलाडी’ हा टॅग, ‘मस्त मस्त गाणं’ आणि ‘चुरा के दिला मेरा’ या तीन गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्या करिअरला वळण देण्याचे काम या तीन घटनांनी केले आहे. अक्षय कुमार याचा ‘नाम शबाना’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून, यामध्ये अक्षयबरोबर तापसी पन्नू, अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या ३१ मार्च रोजी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि सुपरस्टार रजनीकांतसोबतचा ‘२.०’ या सिनेमात अक्षय महत्त्वपूर्ण भूमिकेत बघावयास मिळणार आहे.