पुढे बोलताना अक्षयने म्हटले की, आजही आपल्या देशात ८२ टक्के महिला अशा आहेत, ज्यांच्यापर्यंत अजूनही सॅनेटरी पॅड पोहोचलेच नाहीत. त्यामुळे माझ्या या चित्रपटातून जर यातील पाच टक्के महिला जागृत झाल्या तर मी ही लढाई जिंकली, असे समजेल. अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ज्या महिला पीरियड्सदरम्यान सॅनेटरी पॅडचा खर्च पेलू शकत नाही, त्यांच्याकरिता सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांना ‘पॅडमॅन’ असे नाव पडले.
आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षयकुमारसह राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने डायरेक्ट केले आहे. डायरेक्टर म्हणून ट्विंकल खन्नाने या चित्रपटातून डेब्यू केला आहे. दरम्यान, अक्षयकुमार आपल्या प्रोफेशनल लाइफबरोबरच आपल्या फॅमिलीलाही प्रचंड महत्त्व देतो. वर्षातून चार-पाच चित्रपट करणारा अक्षय आपल्या परिवारालाही पुरेसा वेळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या फॅमिलीसोबत केपटाऊन येथे गेला होता. याठिकाणी त्याने नवीन वर्ष सेलिब्रेट केले.