Join us  

खिलाडी कुमार अक्षयचा 'हाऊसफुल 5' सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:26 AM

'हाऊसफुल 5' सिनेमाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आता 'हाऊसफुल 5' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या सिनेमाची  चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट ते जाणून घेत आहेत. हा सिनेमा चित्रपटगृहांनंतर OTT वर कुठे प्रदर्शित होईल, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता 'हाऊसफुल 5' च्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. तर कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर 'हाऊसफुल 5' प्रदर्शित होणार आहे, हे जाणून घेऊया. 

'हाऊसफुल 5' सिनेमाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.  या सिनेमाच्या रिलीज डेटबाबतची माहिती निर्मात्यांनी आधीच उघड केली आहे. तर 'हाऊसफुल 5' हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 

'हाऊसफुल' हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर 2012 मध्ये 'हाऊसफुल 2' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय, रितेश, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, ऋषी कपूर, रणधीर कपूर, मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोन्ही भागांचे दिग्दर्शन साजिद खान यांनी केले होते. त्यानंतर हाऊसफुल-3 आणि हाऊसफुल-4 हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले. या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता 'हाऊसफुल्ल 5' या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 6 जून 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमारितेश देशमुखहाउसफुल 4