Join us  

Memes : ‘लक्ष्मी’ ठरला ‘फुसका बार’, नेटकऱ्यांनी अशी घेतली अक्कीची मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 5:21 PM

Memes पाहून खो-खो हसाल

ठळक मुद्देम्हणायला लक्ष्मी एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. मात्र चित्रपट घाबरवत नाही. कॉमेडीचे म्हणाल तर ओढूनताणून डायलॉगच्या माध्यमातून विनोद निर्माण करण्याचा थिल्लर प्रयत्न स्पष्ट दिसतो.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीचा  नवा सिनेमा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा रिलीज झाला आणि सोशल मीडियावर मजेदार व भन्नाट मिम्सचा पाऊस पडला. हे भन्नाट मीम्स पाहून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.ओटीटीवर रिलीज झालेल्या अक्षयच्या या सिनेमाकडे खरे तर चाहते डोळे लावून बसले होते. पण सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने चाहत्यांची घोर निराशा केली. समीक्षकांनी तर 2020 मधील अक्षयचा आत्तापर्यंतचा सर्वात बकवास सिनेमा, असे या सिनेमाचे वर्णन केले. आता अशात अक्षयच्या या सिनेमावर मीम्स बनणार नसतील तर नवल.या मीम्सद्वारे नेटक-यांनी अक्षय व त्याच्या चित्रपटाला अक्षरश: झोडपून काढले. एका युझरने डोळ्यात चक्क टॉयलेट क्लिनर घातलाचा फोटो शेअर करत ‘लक्ष्मी बघितल्यावर’ असे मजेदार कॅप्शन दिले.

लक्ष्मीचा झटपट रिव्ह्यु

 राघव लॉरेन्सने सिनेमाचे दिग्दर्शन केले असल्याने अक्षयच्या या सिनेमावर नको इतका साऊथचा प्रभाव जाणवतो. ‘कंचना’ प्रदर्शित होऊन 10 वर्षे झालीत. इतक्या वर्षांनंतर हिंदीत याचा रिमेक तयार होत असेल तर काळानुरूप आणि बॉलिवूड प्रेक्षकानुरूप सुसंगत बदल अपेक्षित आहेत. राघव लॉरेन्सने मात्र जशाच्या तसा रिमेक रिमेक बनून प्रेक्षकांच्या माथी मारला आहे.  साऊथच्या सिनेमातील व्याकरण थेट हिंदीत वापरलेले पाहून डोक्याचा पार भुगा होतो.  साऊथचे सिनेमे आवडत असतील तर ठीक. मात्र असे नसेल तर पहिलेच गाणे खटकते आणि यानंतर सिनेमातील इंटरेस्ट संपतो. या चित्रपटातील प्रत्येक गाणे कथेला सुरूंग लावण्याचे काम करतो. बुर्ज खलीफा हे गाणे हिट आहे. मात्र सिनेमात ते खटकते.म्हणायला लक्ष्मी एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. मात्र चित्रपट घाबरवत नाही. कॉमेडीचे म्हणाल तर ओढूनताणून डायलॉगच्या माध्यमातून विनोद निर्माण करण्याचा थिल्लर प्रयत्न स्पष्ट दिसतो. अक्षयचा सुरुवातीचा अभिनय जबरदस्त आहे. कियारानेही तिच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ख-या लक्ष्मीच्या भूमिकेत शरद केळकर काही क्षण दिसतो, मात्र स्वत:ची छाप सोडून जातो. अन्य कलाकारांनीही आपल्या आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. मात्र उत्तरार्धात चित्रपटाची कथा पूर्णपणे भरकटते. उरतो तो केवळ सावळागोंधळ.  stars -2

 

टॅग्स :लक्ष्मी बॉम्बअक्षय कुमार