Join us  

Happy Birthday Akshay Kumar : ‘गॅरंटी कुमार’चे हे फोटो एकदा पाहाच...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 8:00 AM

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला आणखी एका नावाने ओळखले जाते. ते म्हणजे, ‘गॅरंटी कुमार’. याच ‘गॅरंटी कुमार’चा आज वाढदिवस.

ठळक मुद्देअक्षय कुमारने ज्या पद्धतीने यश मिळवलं, तसंच त्याला करिअरमध्ये अनेक चढऊतारही सहन करावे लागले.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला आणखी एका नावाने ओळखले जाते. ते म्हणजे, ‘गॅरंटी कुमार’. अक्षयचा सिनेमा म्हणजे, यशाची गॅरंटी. म्हणून अक्षयला ‘गॅरंटी कुमार’ म्हणून ओळखले जाते. याच ‘गॅरंटी कुमार’चा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षयचे काही दुर्मिळ फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. हे फोटो क्वचितच तुम्ही पाहिले असतील.

अक्षयचा हा बालपणीचा फोटो कमालीचा सुंदर आहे.

या फोटोत अक्षय त्याचे वडिल हरी ओम भाटिया यांच्यासोबत दिसत आहे.

आई वडिलांसोबत अक्षयचा हा फोटो तुम्ही पाहायलाच हवा.

एका अवार्ड फंक्शनमध्ये अक्षय आईसोबत आला, तेव्हाचा हा क्षण.

अक्षयची बहीण अल्का आणि आई या फोटोत दिसत आहेत.

 ट्विंकल खन्नासोबत लग्नगाठ बांधताना. राजेश खन्ना मुलीचा हात अक्षयच्या हातात सोपवताना

अक्षय पत्नी व मुलांसोबत...

 अक्षय कमारने ‘सौगंध’ या सिनेमातून करिअरची सुरुवात  केली. मात्र त्याची खरी ओळख दिली ती ‘खिलाडी’ या सिनेमाने. अक्षय कुमारचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्षभरात किमान चार तरी सिनेमे  रिलीज होतात. हाच खिलाडी एका वर्षात बारा सिनेमे करायचा यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.

होय, सन १९९४ साली त्याने तब्बल बारा सिनेमे केले होते. ‘ऐलान’ हा १९९४ मधील त्याचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ये दिल्लगी, जय किशन, मोहरा, मै खिलाडी, तू अनाडी, इक्के पे इक्का, अमानत, सुहाग, नजर के सामने, जख्मी दिल, जालीम, हम है बेमिसाल आणि पांडव असे त्याचे बारा सिनेमे या वर्षात रिलीज झाले होते.

अक्षय कुमारने ज्या पद्धतीने यश मिळवलं, तसंच त्याला करिअरमध्ये अनेक चढऊतारही सहन करावे लागले. कधी अ‍ॅक्शन, कधी कॉमेडी, तर कधी खिलाडी या अशा भूमिकांमधून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली.

टॅग्स :अक्षय कुमार