उच्च न्यायालयातूनही अक्षय कुमारला मिळाला नाही दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:29 IST
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी बॉलिवूड चित्रपट ‘जॉली एलएलबी २’च्या विरोधात क रण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या ...
उच्च न्यायालयातूनही अक्षय कुमारला मिळाला नाही दिलासा
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी बॉलिवूड चित्रपट ‘जॉली एलएलबी २’च्या विरोधात क रण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. बाटाने केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने समन्स जारी केला होता. यात अभिनेता अक्षय कुमार, अन्नू कपूर, दिग्दर्शक सुभाष कपूर व निर्माता यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी स्थगिती देण्यास नकार देत दिल्ली पोलिसांना नोटिस बजावली असून ३० मार्च पर्यंत उत्तर मागविले आहे. कनिष्ठ न्यायालयाने ८ फे ब्रुवारी रोजी ‘जॉली एलएलबी २’चे निर्माता फॉक्स स्टार स्टुडिओज इंडिया प्रायव्हेट लि., कार्यकारी निर्माता नरेन कुमार, सुभाष कपूर, अन्नू कपूर व अक्षय कुमार यांच्या नावे समन्स जारी करीत २२ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. प्रसिद्ध फुटवेअर ब्रँड बाटाने त्याच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. ‘जॉली एलएलबी २’च्या पहिल्या अधिकृत ट्रेलरमध्ये बाटा या ब्रँडसाठी अपमानजनक टीका व अपमान करणाºया गोष्टी असल्याचा दावा बाटाने केले होता. उच्च न्यायालयाने समन्सवर स्थगितीला नकार देताना सांगितले की, फॉक्स स्टारच्या व्यतिरिक्त न्यायालयासमोर कुणीच हजर झालेले नाही. कंपनी कनिष्ठ न्यायालयात आपल्या एखाद्या प्रतिनिधीच्या रूपात हजर राहू शकत होते. मात्र तसे करण्याचे सौजन्य दाखविले नाही. बाटाने आपल्या याचिकेत सांगितले आहे की, बाटा ब्रँडला चित्रपटाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक खराब दाखविण्यात आले आहे. यामाध्यमातून असे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, बाटा फू टवेअर समाजातील के वळ खालच्या स्तराचे लोक परिधान करतात, जर एखादा व्यक्ती बाटाचे शूज घालत असेल तर तो स्वत:चा अपमान मानू शकतो. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या आदेशात, प्रथमदृष्या आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ५०० नुसार अब्रुनुजसान व १२० बी नुसार गुन्हात समावेश असल्याचे दिसून येते. यामुळे पुढील कार्यवाहीसाठी सबळ पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले होते.