Join us  

डायरेक्ट दिल से...! अक्षय कुमार बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनबद्दल बोलला, वाचा काय म्हणाला...   

By रूपाली मुधोळकर | Published: October 04, 2020 11:22 AM

खूप दिवसांपासून मनात काही होते, आज तुमच्याशी शेअर करतोय, असे म्हणत अक्कीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

ठळक मुद्दे अक्षयच्या या व्हिडीओला अनेकांनी पाठींबा दिला आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कमेंट केल्या आहेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर आलेत. रिया चक्रवर्तीपासून दीपिाक, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग अशा अनेक बड्या अभिनेत्रींना एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. आता अक्षय कुमारने बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर प्रतिक्रिया दिली आहे. खूप दिवसांपासून मनात काही होते, आज तुमच्याशी शेअर करतोय, असे म्हणत अक्कीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. अक्षयच्या या व्हिडीओला अनेकांनी पाठींबा दिला आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कमेंट केल्या आहेत. यात करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन,अंगद बेदी अशा अनेकांचा समावेश आहे.

काय म्हणाला अक्षय...

अक्षय कुमारने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. यात तो म्हणतो, ‘आज काहीशा जड मनाने तुमच्यासोबत बोलतोय. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक गोष्टी मनात होत्या. पण आजुबाजूला इतकी निगेटीव्हीटी आहे की, कसे बोलू, कोणाला बोलू याचा विचार करत होतो. आम्ही म्हणायला स्टार्स आहोत. पण बॉलिवूड हे केवळ तुमच्या प्रेमामुळे उभे आहे.   जनतेच्या भावना आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मग तो अँग्रीमॅनचा आक्रोश असो, भ्रष्टाचार, गरिबी किंवा मग बेरोजगारी. प्रत्येक मुद्दा आम्ही चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक मुद्दे समोर आलेत. या घटनेने आम्हाला तुमच्याइतकेच दु:ख झाले. या पाठोपाठ आलेल्या मुद्यांनी आम्हाला चिंतन करण्यासाठी प्रवृत्त केले. आमच्या इंडस्ट्रीतील अनेक त्रूटी समोर आाल्यात. सध्याचा ड्रग्जचा मुद्दा यापैकी एक़ इंडस्ट्रीत ड्रग्जची समस्या नाहीत, असे मी तु्हाला खोटे सांगणार नाही. इंडस्ट्रीत ही समस्या आहे. ज्याप्रकारे अन्य इंडस्ट्रीत आहे, त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्येही आहे. पण म्हणून बॉलिवूडमधील प्रत्येक व्यक्ती यात गुंतला आहे, असे समजणे चुकीचे आहे. मी फक्त ऐवढेच म्हणेल की, सर्वांना एकाच नजरेतून बघू नका. हे चूक आहे, गैर आहे. मीडियावर माझा विश्वास आहे. पण मुद्दा उचलताना थोडी संवेदनशीलता बाळगा. कारण तुमची एक निगेटीव्ह न्यूज एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षांपासून कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकते. त्या व्यक्तिला उद्धवस्त करू शकते. शेवटी एकच म्हणेल की, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तेव्हा अशीच सोबत द्या. आम्ही चांगले काम करू, इतकाच विश्वास आम्ही देऊ शकतो.’

थिएटर उघडल्यावर सुद्धा रिलीज होणार नाही अक्षय कुमारचा सूर्यवंशी, समोर आले हे कारण

खरंच खिलाडी! 'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारने मोडला स्वत:चा १८ वर्ष जुना नियम, सगळेच झाले थक्क...

ड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली!!

टॅग्स :अक्षय कुमार