'जॉली एलएलबी'ची फ्रँचायजी असलेला 'जॉली एलएलबी ३' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून अक्षय कुमार आणि अर्शद वारसी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'जॉली एलएलबी ३'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 'जॉली एलएलबी ३' मधील 'ग्लास उँची रखे' हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.
'ग्लास उँची रखे' हे जॉली एलएलबी ३ मधील पार्टी साँग आहे. मेघा बाली यांनी हे गाणं लिहिलं असून त्याला विक्रम मोंट्रोस यांनी संगीत दिलं आहे. तर मेघा बाली, विक्रम मोंटोस, करण कपाडिया, चन्ना घुमन यांनी हे गाणं गायलं आहे. अवघ्या काही मिनिटांतच 'ग्लास उँची रखे' या गाण्याला हजारोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा पार्टी अंदाज पाहायला मिळत आहे.
'जॉली एलएलबी ३'मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. कोर्टात सिनेमात अर्शद वारसी विरुद्ध अक्षय कुमार म्हणजे जॉली व्हर्सेस जॉली अशी चुरस रंगणार आहे. त्यांच्यासोबत 'जॉली एलएलबी ३'मध्ये हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला हे कलाकारही दिसणार आहेत. येत्या १९ सप्टेंबरला 'जॉली एलएलबी ३' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.