अक्षय खन्ना परत येतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 07:07 IST
गत चार वर्षांपासून बॉलिवूडमधून जवळपास दिसेनासा झालेला अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा दमदार एन्ट्री करीत आहे. या वर्षांत अक्षयचे दोन ...
अक्षय खन्ना परत येतोय...
गत चार वर्षांपासून बॉलिवूडमधून जवळपास दिसेनासा झालेला अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा दमदार एन्ट्री करीत आहे. या वर्षांत अक्षयचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सर्वात आधी अक्षय ‘ढिशूम’मध्ये दिसणार आहे. यात अक्षयसोबत जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्याही भूमिका आहेत. रोहित धवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘ढिशूम’ नंतर अक्षयचा ‘मॉम’ हा चित्रपटही याचवर्षी रिलीज होत आहे. यात अक्षय महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळते. यात श्रीदेवी, नवाजउद्दीन सिद्दीकी व अभिमन्यू सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. बोनी कपूर हा चित्रपट घेऊन येत आहेत.