अक्षयने दिले सुभाष कपूरला गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2016 21:36 IST
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला सुभाष कपूर दिग्दर्शित करीत असलेल्या जॉली एलएलएबीची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची शूटिंग ...
अक्षयने दिले सुभाष कपूरला गिफ्ट!
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला सुभाष कपूर दिग्दर्शित करीत असलेल्या जॉली एलएलएबीची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची शूटिंग केवळ 30 दिवसांत पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 दिवसांत शूटिंग पूर्ण झाल्याने हे सुभाष कपूरसाठी गिफ्ट असल्याचे तो सांगतो आहे. केवळ 30 दिवसांत शूटिंग पूर्ण झाल्याने आनंदित असलेला अक्षय यासाठी सुभाष कपूरसह संपूर्ण टीमला श्रेय देतोय. ‘सुभाष कपूर यांच्या प्लॅनिंगमुळे हे शक्य झाले, असे अक्षय सांगतो. शूटिंगसाठी वेळेवर हजर राहणे माझे काम आहे, हे मी सुभाष कपूर यांना दिलेली भेट तुम्ही समजू शकता. चांगली स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्ले या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मला गिफ्ट दिले आहे. निर्मात्यांनी निवडलेली लोकेशन्स खरी होती. अशावेळी मी त्यांना ताटकळत ठेवणे माझ्या तत्त्वात बसत नाही. आम्ही सर्व गाण्याचे चित्रीकरण एकापाठोपाठ केले. एवढेच नव्हे तर उशीरापर्यंत थांबून आम्ही आपले काम पूर्ण केले’.आपल्या टीमची प्रसंशा करताना तो म्हणाला, आर्मी जवानांना देखील एका दिवसाची सुट्टी मिळते. मी माझ्या टीमला रविवारी सुट्टी दिली. आम्ही रविवारी जरी काम केले नाही, पण सोमवारी आम्ही डबल शिफ्टमध्ये काम करून आमचा निश्चय पूर्ण केला. सर्वांत कमी वेळात शूटिंग पूर्ण झाल्याची हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दिसते. यावर्षी अक्षय कुमारचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यापैकी दोन चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर 100 कोटींच्यावर कमाई केली आहे.