Join us

अक्षयने केला ‘त्या’ पोलिसाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 14:18 IST

अक्षय कुमार नेहमीच सामाजिक भान जागृत ठेवतो. रुपेरी पडद्यावर अनेकदा सैनिक आणि पोलिसांची भूमिका रंगवणाऱ्या अक्षयने एका रिअल लाईफ ...

अक्षय कुमार नेहमीच सामाजिक भान जागृत ठेवतो. रुपेरी पडद्यावर अनेकदा सैनिक आणि पोलिसांची भूमिका रंगवणाऱ्या अक्षयने एका रिअल लाईफ पोलीस हीरोची ट्विटरवर तोंडभरून कौतुक केले आहे.कॉन्स्टेबल पवन तायडे यांनी धावत्या रेल्वेतून उतरताना पडलेल्या एका महिलेचा कमालीच्या चपळतेने जीव वाचवला.या घटनेचा व्हिडिओ अक्षयने ट्विटरवर पोस्ट करून त्याखाली लिहिले की, ‘हे पाहून माझ्या अंगावर अक्षरश: काटा आला. लोनावळा येथील कॉन्स्टेबल पवन तायडेंनी दाखवलेले प्रसंगावधान खरोखरंच कौतुकास्पद आहे. ज्या चपळतेने त्यांनी महिलेचा जीव वाचवला, ते पाहून तर मी त्यांना सलाम करतो.’