अक्कीच्या स्टुडंटने छेड काढणाºयाची केली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 17:31 IST
अभिनेता अक्षय कुमार याने मुंबईत आदित्य ठाकरेसोबत वूमेन सेल्फ डिफेन्स सेंटर उघडले होते. या सेल्फ डिफेन्स सेंटरमध्ये अक्षयने स्वत: ...
अक्कीच्या स्टुडंटने छेड काढणाºयाची केली धुलाई
अभिनेता अक्षय कुमार याने मुंबईत आदित्य ठाकरेसोबत वूमेन सेल्फ डिफेन्स सेंटर उघडले होते. या सेल्फ डिफेन्स सेंटरमध्ये अक्षयने स्वत: मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले होते. या सेल्फ डिफेन्स सेंटरमध्ये अक्षयच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मुली आता स्वरक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत. विश्वास नाही, बसत ना. याच सेंटरमधील श्रेया नाईक या १९ वर्षांच्या तरूणीने तिची छेड काढणाºयाला असा काही हिसका दाखवता की, खुद्द अक्कीलाही श्रेयाचा अभिमान वाटावा. गत आठवड्यात श्रेया संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास आपल्या घराकडे परतत असताना अंधेरीजवळ एका सुनसान जागी,वेटरच्या पोशाखातील एक व्यक्ति श्रेयाची छेड काढू लागला. काही कळायच्या आत तो श्रेयाजवळ आला आणि त्याने तिला स्पर्श केला. श्रेया लगेच अलर्ट झाली आणि एका हाताने तिने त्याला पकडून ठेवले. त्याचवेळी दुसºया हाताने आईला फोन केला. घर अगदी काही सेकंदाच्या अंतरावर असल्याने तिने तात्काळ आईला मदतीसाठी बोलवले. यादरम्यान छेड काढणाºया मजनूला तिने जराही हलू दिले नाही. त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण श्रेयाने त्याला चांगलेच चीत केले. तोपर्यंत आजूबाजूचे काही लोक तिच्या मदतीला धावले आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आले आणि मजनूला पकडून नेले. श्रेयाचे हे धाडस बघून अक्षयलाही अभिमान वाटत असावा..का नाही, शेवटी त्याची स्टुडंट आहे ती...