अक्कीने वाचवला इलियानाचा जीव !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 14:55 IST
सध्या अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रुझ हे ‘रूस्तम’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. तसेही अक्षय कुमार ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जातोच. त्याच्या ...
अक्कीने वाचवला इलियानाचा जीव !
सध्या अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रुझ हे ‘रूस्तम’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. तसेही अक्षय कुमार ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जातोच. त्याच्या ‘हॉलीडे’ आणि ‘बेबी’ चित्रपटात त्याने आर्मीमधील व्यक्तीची भूमिका केली आहे. त्यामुळे आॅफ स्क्रीनही तो कुठल्याही कामासाठी एकदम तत्पर असतो.‘रूस्तम’ चित्रपटामधील‘हॉर्स रायडिंग’ चा सीन शूट होत होता. तेव्हा अचानक इलियाना बसलेला घोडा ‘आऊट आॅफ कंट्रोल’ झाला. अक्कीने लगेचच प्रसंगावधान लक्षात घेऊन तिला घोड्यावरून खाली ओढले आणि घोड्याचा ताबा घेतला.वेल, अक्की व्हेरी गुड.. तो केवळ आॅनस्क्रीन हिरोईनचा जीव वाचवतो असे नव्हे तर आॅफस्क्रीनही तो हिरोईन्सची काळजी घेत असतो, हे यावरून कळते.