अक्की रमला इतिहासात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 09:05 IST
भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडित सर्वच चळवळी इतिहासातील घटनांशी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. चळवळीतील प्रत्येकाचा वाटा हा तितकाच अनमोल आहे. ज्यामुळे ...
अक्की रमला इतिहासात...
भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडित सर्वच चळवळी इतिहासातील घटनांशी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. चळवळीतील प्रत्येकाचा वाटा हा तितकाच अनमोल आहे. ज्यामुळे आज हा देश मुक्तपणे श्वास घेऊ शकत आहे. या स्वातंत्र्य चळवळीमुळे भारताला लोकमान्य बाळगंगाधर टिळकसारखे हिरो आजही मिळाले आहेत.त्यांचे घोषवाक्य आजही सर्वांच्या लक्षात आहे,‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ . अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘रूस्तुम’ साठी शूटिंग करत असून तो यात एका नवल आॅफीसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची लढाई त्याचा देश आणि प्रामाणिकतेशी आहे. त्याने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ रिव्हिजिटिंग हिस्ट्री व्हाईल शूटिंग फॉर रूस्तुम! स्टँडिंग आऊटसाईड द रूम व्हेअर द ग्रेट नॅशनॅलिस्ट, लोकमान्य टिळक लाईव्ह अॅज अ स्टुडंट.’तो त्याच्या भूमिकेच्या लुकमध्येच दिसतो आहे. नेव्ही ब्लु शर्ट आणि मिशांमध्ये तो एकदम देशभक्त दिसतो आहे. तिथेच चित्रपटाचे काही शूट करण्यात येत आहेत. त्याच्यासाठी अत्यंत अभिमान व्यक्त करण्यासारखी ही बाब आहे.