Join us

‘अकीरा’ च्या पोस्टरला अक्षयचा पाठिंबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 12:25 IST

 सोनाक्षीला कधी अ‍ॅक्शन लुकमध्ये पाहिलंय ? नाही ना. आता तुम्हाला ‘अकिरा’ मध्ये तिला तुफान मारामारी करताना पाहता येणार आहे. ...

 सोनाक्षीला कधी अ‍ॅक्शन लुकमध्ये पाहिलंय ? नाही ना. आता तुम्हाला ‘अकिरा’ मध्ये तिला तुफान मारामारी करताना पाहता येणार आहे. सध्या तिच्या चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र  सुरू आहे. ‘अकीरा’ च्या पोस्टरमध्ये तिचा लुक पाहून कुणालाही वाटेल की, सोनाक्षी जाम हॉट दिसतेय.वेल, हीच प्रतिक्रिया अक्षय कुमारनेही व्यक्त केली. त्याने तर म्हणे ‘अकीरा’ च्या पोस्टरचे खुप कौतुक केले. ट्रेलर लाँचिंगवेळी बोलताना ती म्हणाली,‘अक्षय मुरूगादोस सरांना ओळखतात.त्यामुळे त्यांनी मी हा चित्रपट घेण्याअगोदर मला सांगितले. हा चित्रपट तुझ्यासाठी गेम चेंजर असणार आहे. अक्षय म्हणाला,‘आँखे बंद करके करले. ’ अक्षय कुमार माझ्या चित्रपटाला खुपच पाठिंबा देणारा आहे.