Join us

​अखरे शाहरुख आलियाच्या चित्रपटाचे नाव ठरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 14:25 IST

शाहरुख खान आणि आलिया भट एकत्र चित्रपटात काम करणार ही बातमी आल्यापासून सर्वांनाचा या चित्रपटाची उत्सुकता लागली.‘इंग्लिश विंग्लिश’नंतर ...

शाहरुख खान आणि आलिया भट एकत्र चित्रपटात काम करणार ही बातमी आल्यापासून सर्वांनाचा या चित्रपटाची उत्सुकता लागली.‘इंग्लिश विंग्लिश’नंतर गौरी शिंदे दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात हे दोघे झळकणार आहेत. चित्रपटाची शुटिंग पूर्णदेखील झाली आहे. मात्र अजुनपर्यंत फिल्मचे नाव काय हे कोणालाच माहित नव्हते.परंतु चित्रपटाच्या निगडित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘डिअर जिंदगी’ असे नाव ठरले असल्याचे कळते. आतापर्यंत याला ‘वॉक द टॉक’ किंवा ‘प्रोजेक्ट ५१’ या नावाने ओळखले जायचे.एकदम हटके प्रेमकथा ‘डिअर जिंदगी’मध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये आलिया मुख्य भूमिकेत असून शाहरुखबरोबरच आदित्य रॉय कपूर, अली झफर, कुणाल कपूर आणि अंगद बेदी अशी स्टारकास्ट आहे.यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान चित्रपट रिलीज करण्याचा विचार निर्माते करत आहेत.  विशेष म्हणजे शाहरुख आणि करण जोहर मिळून या चिद्धपटाची निर्मिती करत आहेत.