Join us

​अजय-काजोलची इन्स्टाग्रामवर धम्माल मस्ती!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:59 IST

अजय देवगण आणि काजोल दोघेही पती-पत्नी असले तरी त्यांच्यातील खरे नाते मैत्रीचेच आहे. दोघेही कायम परस्परांशी मस्ती- मज्जा करताना, एकमेकांची टिंगल करताना दिसतात, ते त्यामुळेच.

अजय देवगण आणि काजोल दोघेही पती-पत्नी असले तरी त्यांच्यातील खरे नाते मैत्रीचेच आहे. दोघेही कायम परस्परांशी मस्ती- मज्जा करताना, एकमेकांची टिंगल करताना दिसतात, ते त्यामुळेच. मग ते टिष्ट्वटरवर असो वा इन्स्टाग्रामवर. ताजा पुरावा म्हणजे अजय व काजोलची ताजी इन्स्टाग्राम पोस्ट. अजयने आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर इन्स्टाग्रामवर मुलगा युग आणि मुलगी न्यासा या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला एक गोड कॅप्शनही दिले आहे. ‘भाऊ-बहिणीचे खरे प्रेम काहीसे असे असते,’असे अजयने फोटोखाली लिहिले. आता अजयने युग व न्यासाचा फोटो पोस्ट केलेला पाहून काजोल थोडीच गप्प बसणार. ‘माझी कल्पना चोरून युग व न्यासाचा फोटो शेअर करणे, हेही खरे प्रेम आहे,’असे काजोलने यावर लिहिले. अर्थ सोपा आहे, खरे तर काजोलला युग व न्यासाचा फोटो शेअर करायचा होता. पण त्याआधी अजयनेच बाजी मारली. आहे ना धम्माल मस्ती!!