अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:17 IST
तामीळ थ्रिलर सिनेमा विसरनाईमध्ये समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोराच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोर
तामीळ थ्रिलर सिनेमा विसरनाईमध्ये समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोराच्या भूमिकेत दिसणार आहे. मी चित्रपटात अनुष्काच्या राज्यातील दरोडेखोर असल्याचे त्याने सांगितले आहे. पाच दिवसांचे शूटिंग संपवून तो नुकताच केरळमधून परतला असून पुढच्या शूटिंगसाठी मार्चमध्ये परत जाणार असल्याचे त्याने सांगितले.इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग झाल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. स्वत:ला सिनेमाच्या पडद्यावर पाहण्यासाठी मी उतावीळ झालो असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.