Join us

अजय देवगणचा मुलगा युगचे फिटनेस चॅलेंज बघून भल्याभल्यांनाही घाम फुटेल, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 20:03 IST

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दिग्गजांना फिटनेस चॅलेंज दिले होते. यानंतर सोशल ...

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दिग्गजांना फिटनेस चॅलेंज दिले होते. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी चॅलेंज स्वीकारत वर्कआउट करणारे व्हिडीओ पोस्ट केले. अनेकांनी तर केवळ चॅलेंज स्वीकारलेच नाही तर इतरांनाही चॅलेंज दिले. एकूणच या फिटनेस चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता या कॅम्पेनमध्ये अभिनेता अजय देवगणचा मुलगा युग याचाही समावेश झाला आहे. युगने देशातील तरुणांना फिटनेस चॅलेंज दिले आहे.अजयचा मुलगा युगने यंग इंडिया अर्थात देशातील सर्वच तरुणांना फिटनेस चॅलेंज दिले आहे. अजयने मुलाच्या फिटनेसचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. ज्यामध्ये लहान वयातच युग जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. त्याचे वय लक्षात घेता तो करीत असलेले स्टंट खरोखरच जबरदस्त आहेत. या व्हिडीओच्या अखेरीस एक डिस्कलेमर सुद्धा देण्यात आले आहे. त्यामध्ये लहान मुलांनी अशाप्रकारचे स्टंट प्रोफेशनल ट्रेनरच्या देखरेखीखालीच करावे. अजयने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'युगचे यंग इंडियाला हम फिट तो इंडिया फिटनेस चॅलेंज'' दरम्यान, हम फिट तो इंडिया फिट या चॅलेंजमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. हृतिक रोशन, रणदीप हुड्डा, अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, अनुष्का शर्मा आणि सौम्या टंडन यांसारख्या कलाकारांनी या चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. पण काहीही असो या सर्व स्टार्समध्ये अजयच्या युगचे फिटनेस चॅलेंज कौतुकास्पदच म्हणावे लागेल.