अजय देवगणनंतर 'हा' स्टार करणार रोहित शेट्टीच्या चित्रपटात अॅक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:45 IST
दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच आपला आवडता अभिनेते रणवीर सिंगसोबत चित्रपट तयार करणार आहे. अजूनपर्यंत रोहितकडून ही गोष्ट कन्फर्म करण्यात ...
अजय देवगणनंतर 'हा' स्टार करणार रोहित शेट्टीच्या चित्रपटात अॅक्शन!
दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच आपला आवडता अभिनेते रणवीर सिंगसोबत चित्रपट तयार करणार आहे. अजूनपर्यंत रोहितकडून ही गोष्ट कन्फर्म करण्यात आली नव्हती. रणवीर सिंगने सध्या अनेक चित्रपट साईन केले आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ऑन फ्लोअर येणार आहे. नुकतीच रोहितने या गोष्टीचे पुष्टी केली आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान रोहित म्हणाला, ''हो मी आणि रणवीर एकत्र चित्रपटात काम करणार आहोत. रणवीर सध्या संजय लीला भंसाली यांच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो जोया अख्तरच्या गल्ली बॉयमध्ये दिसणार आहे. आमचा चित्रपट पुढच्या वर्षी फ्लोअरवर येणार आहे. यात तुम्हाला रणवीर अॅक्शन करताना दिसणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे.'' सध्या रणवीर आणि रोहित आपआपल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. रणवीर सध्या पद्मावतीचे शूटिंग पूर्ण करण्यात बिझी आहे. रणवीर यानंतर झोया अख्तरच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ज्यात तो एका रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रोहित शेट्टी सध्या खतरों कि खिलाडी या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करतो आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याच्या गोलमाल सीरिजचा गोलमाल अगेन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोलमाल अगेनमध्ये यावेळी अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, कुणाल खेमू यांच्याशिवाय तब्बू, परिणीती चोप्रा आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत.