रितेश देशमुख आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'रेड २' १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच सिनेमाने कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. सुरुवातीपासूनच 'रेड २'ला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन २३ दिवस झाले आहेत. तरीदेखील 'रेड २' बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'रेड २'ने पहिल्याच दिवशी १९.२५ कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने तब्बल ९५.७५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ४०.६ कोटींचा बिजनेस या चित्रपटाने केला. तर तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने २०.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. अशाप्रकारे सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'रेड २'ने आत्तापर्यंत १५६.८५ कोटींची कमाई केली आहे.
'रेड २' हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सीक्वल आहे. या सिनेमात रितेश देशमुख, अजय देवगण, वाणी कपूर, सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात अजय देवगण अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे.