Join us  

Bholaa: ‘दृश्यम-2’नंतर अजय देवगण घेऊन येतोय आणखी एक नवा सिनेमा, मोशन पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:13 PM

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणच्या ( Ajay Devgn ) ‘दृश्यम-2’ (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  अशात अजयने आपल्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणच्या ( Ajay Devgn ) ‘दृश्यम-2’ (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झालेल्या आणि तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं तीनच दिवसांत 64.14 कोटींची कमाई केली आहे. अशात अजयने आपल्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. काही तासांआधी अजयने आपल्या नव्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज केलं.

अजयच्या या नव्या सिनेमानं नाव ‘भोला’ (Bholaa) आहे. सोशल मीडियावर अजयने या चित्रपटाचं मोशल पोस्टर शेअर केलं. ‘An unstoppable force is coming’ अशी टॅग लाईन देत त्याने हे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाचा टीझर उद्या 22 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. मोशन पोस्टरमध्ये अजयचा संपूर्ण लुक दाखवलेला नाही. फक्त यात तो माथ्यावर भस्म लावताना  दिसतो. वो कौन है? असं कॅप्शनमध्ये  लिहिलं आहे. ‘भोला’चं मोशन पोस्टर पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत.

‘भोला’ हा सिनेमा ‘कॅथी’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ओरिजनल सिनेमात साऊथ स्टार कार्थी लीड रोलमध्ये होता. ‘भोला’मध्ये अजय देवगण लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत तब्बू, संजय मिश्रा व दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘कॅथी’ एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. अजय देवगण  हिंदी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा 3 डीमध्ये घेऊन येतोय. 30 मार्च 2023 रोजी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं कळतंय. मात्र उद्या टीझरसोबत या सिनेमाची फायनल रिलीज डेट समोर येणार आहे.

‘भोला’ शिवाय अजयचा ‘मैदान’ हा आगामी सिनेमा 17 फेबु्रवारी 2023 रोजी रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

टॅग्स :अजय देवगणदृश्यम 2तब्बूबॉलिवूड