अजय देवगणने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला वाढदिवस, आॅनस्क्रिन मुलगा अन् मुलगीही झाले होते सहभागी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 17:31 IST
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने त्याचा ४९वा वाढदिवस पॅरिस येथे आपल्या परिवारासोबत सेलिब्रेट केला. यावेळी त्याचा आॅनस्क्रिन मुलगा आणि मुलगीही सहभागी झाले होते.
अजय देवगणने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला वाढदिवस, आॅनस्क्रिन मुलगा अन् मुलगीही झाले होते सहभागी!
बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगणने २ एप्रिल रोजी वयाचे ४९ वर्ष पूर्ण केले आहेत. अजयने त्याचा वाढदिवस आपल्या परिवारासोबत पॅरिस येथे सेलिब्रेट केला. नुकताच अजयने त्याच्या इन्स्टाग्रामवर बर्थ डे सेलिब्रेशनचा आपल्या फॅमिलीसोबतचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये पत्नी काजोल, मुलगी न्यासा, मुलगा युग बघावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्याचा आॅनस्क्रिन मुलगा आणि मुलगीही दिसत आहे. होय, वत्सल सेठ आणि इशिता दत्ता हेदेखील त्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. वत्सलने ‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटात त्याच्या आॅनस्क्रिन मुलाची भूमिका साकारली होती. तर इशिताने ‘दृश्यम’मध्ये त्याच्या मुलीची भूमिका साकारली. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये अजयचा मुलगा युग काहीसा नाराज दिसत आहे. तर दुसºया एका फोटोमध्ये तो चॉकलेट्ससोबत पोज देताना बघावयास मिळत आहे. यावेळी युगच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा आहे. दरम्यान, रविवारी रात्रीच अजय पत्नी काजोल आणि मुलांसोबत मुंबई विमानतळावरून पॅरिसला रवाना झाला. वत्सल सेठ आणि इशिता अजयच्या फॅमिलीच्या खूपच क्लोज आहेत. या कपलच्या सीक्रेट लग्नातही इंडस्ट्रीमधून फक्त देवगण फॅमिलीच सहभागी झाली होती. दरम्यान, अजयच्या वाढदिवसानिमित्त इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सनी त्याला शुभेच्छा दिल्या. रितेश देशमुख, विवेक ओबरॉय यांच्यासह बोमन ईरानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजयला शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वीच अजयचा ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या त्याचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करीत आहे. शंभर कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी हा चित्रपट काही पावलेच दूर आहे.