Join us

अजय देवगणच्या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:24 IST

ऐकायसा थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे की अजय देवगणच्या अभिनेत्री ने एकदाच नाही तर भरपूर वेळ आत्महत्या ...

ऐकायसा थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे की अजय देवगणच्या अभिनेत्री ने एकदाच नाही तर भरपूर वेळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ह्याची कबुली तिने स्वतःच दिली आहे. अजय देवगणची ही हिरोईन दुसरी कोणी नसून इलियाना डिक्रूज आहे. रविवारी झालेल्या २१व्या विश्व हेल्थ काँग्रेसच्या शेवटच्या दिवशी तिने हा खुलासा केला.इलियाना म्हणाली की, "माझ्या बरोबर मला साथ देणारे कुटूंब चांगले मित्र आणि यशस्वी करिअर आहे. तरीपण माझ्या काही भावना आहेत मी ही माझे ध्येय गाठण्यासाठी तेवढाच संघर्ष केला जेवढा बाकीचे लोक करतात भले मी त्यांना जास्त मदत करू शकत नाही  पण माझ्या परीने मी मदत केली पाहिजे. ती पुढे म्हणाली की "मी माझ्या शरीराला घेऊन नेहमी चिंतीत असायची माझ्या कमकुवत शरीराकडे बघून मी नेहमी निराश व्हायची त्यामुळे मी हळूहळू डिप्रेशनमध्ये गेली. मी सारखी उदास असायची एक वेळ अशी आली की मला आत्महत्या करावीशी वाटली मी स्वतःला संपवण्याचा विचार करू लागली पण सुदैवाने मी स्वतःला सांभाळले आणि मी जशी आहे त्याचा मी स्वीकार केला" डिप्रेशनशी आपण लढू शकतो जर आपल्याला दुखापत होते त्यावर आपण इलाज करतो तसेच जर तुम्हाला डिप्रेशन आहे तर जाऊन कोणाची तरी मदत घ्या मला असे वाटते की आपण जसे आहोत तसा स्वतः चा स्वीकार केला पाहिजे. इलियानाने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू नीबोनसोबतचा असाच एक ‘रोमॅन्टिक’ क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फोटो इलियानाने  इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ‘एका वेगळ्याच दुनियेतील तो क्षण’ असे कॅप्शन दिले आहे. इलियानाचा बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू एक फोटोग्राफर आहे. आॅस्ट्रेलियात राहणा-या अ‍ॅन्ड्र्यूला इलियानाचे फोटो काढणे आवडते. इलियानाचे अनेक फोटो त्याने काढले आहेत. २०१२ मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.