‘गोलमाल4’चे शूटींग सोडून अजय देवगण पोहोचला अजमेर शरीफला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 13:42 IST
अभिनेता अजय देवगण सध्या ‘गोलमाल4’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असतानाच अजय अचानक अजमेर शरिफला पोहोचला. ख्वाजा मोईउद्दीन ...
‘गोलमाल4’चे शूटींग सोडून अजय देवगण पोहोचला अजमेर शरीफला!
अभिनेता अजय देवगण सध्या ‘गोलमाल4’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असतानाच अजय अचानक अजमेर शरिफला पोहोचला. ख्वाजा मोईउद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यावर त्याने चादर चढवली. यावेळचे अजयचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अजय एकटा दिसतो आहे. काजोल व कुटुंबातील कुणीही त्याच्यासोबत नाही. ALSO READ : ‘ही’ अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात झाली होती वेडी; सुसाइड करण्याचा केला होता प्रयत्न!!गतवर्षी आलेला अजयचा ‘शिवाय’ हा चित्रपट फ्लॉप झाला. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अजयच्या आईची प्रकृती ठीक नाही. यामुळे अजय चिंतीत आहे. ‘शिवाय’ हा चित्रपट स्वत: अजयने दिग्दर्शित केलेला होता. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला. त्यामुळे येत्या काळात अजयला त्याच्या आगामी चित्रपटांकडून बºयाच अपेक्षा आहेत. ‘गोलमाल4’ शिवाय ‘बादशाहो’ या चित्रपटातही अजय दिसणार आहे. ‘गोलमाल4’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या ‘खतरों के खिलाडी’च्या शूटींगसाठी स्पेनमध्ये आहे. त्यामुळे अख्ख्या ‘गोलमाल4’ टीमला सध्या काही दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. याच ब्रेकमध्ये अजय अजमेरला पोहोचला. याठिकाणी अजयने काय प्रार्थना केली, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण अजयची प्रार्थना पूर्ण होवो, त्याच्या मनासारखे घडो, अशीच कामना आम्ही करतो. ‘बादशाहो’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात सनी लिओनी हिचा आयटम नंबरही पाहायला मिळणार आहे. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ फेम डायरेक्टर मिलन लुथरिया हा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’चा सीक्वल आपटल्यानंतर मिलन लुथरिया फुंकून फुंकून ताक पित आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा लकी चार्म अजय देवगणला साईन केले आहे.