काजोलवर दर दुस-या दिवशी चिडतो अजय देवगण! पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 14:58 IST
आपल्या सामान्यांच्या घरात भांड्याला भांड लागणं, अतिशय कॉमन गोष्ट. नवरा-बायकोच्या कुरबुरी आपल्या प्रत्येकाच्या घरात सुरु असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरातही ...
काजोलवर दर दुस-या दिवशी चिडतो अजय देवगण! पण का?
आपल्या सामान्यांच्या घरात भांड्याला भांड लागणं, अतिशय कॉमन गोष्ट. नवरा-बायकोच्या कुरबुरी आपल्या प्रत्येकाच्या घरात सुरु असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरातही अशा कुरबुरींना जागा असेल का? विशेषत: बॉलिवूड नट्या नव-याकडून ओरडा वगैरे खात असतील का? असे प्रश्न एकदा तरी तुमच्या डोक्यात डोकावले असणारच. तर चला, आता आम्ही तुमच्या या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत. इतर नट्यांचे आम्हाला फार ठाऊक नाही. पण अभिनेत्री काजोलचे मात्र आम्ही सांगू शकतो. काजोल दर दुस-या दिवशी नव-याकडून अर्थात अजय देवगणकडून ओरडा खातेचं खाते. (अर्थात या ओरड्याची कारणे आपल्यासारखी ‘फालतू’ कॅटेगिरीतील नाहीत. ) आता काजोल अजयचा ओरडा का खाते, यामागे कारण जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर कारण एकच आहे, ते म्हणजे, काजोलचे डिप्लोमसीला गंभीरपणे न घेणे. काजोलने स्वत:च एका मुलाखतीत हे सांगितले. मी डिप्लोमॅटिक होऊ शकत नाही. अनेकदा माझा नवरा माझ्या या स्वभावामुळे संकटात पडतो. पण तरिही मी डिप्लोमसी गंभीरपणे घेत नाही. पार्टीत मी असे वागत नाही, त्यामुळे दर दुसºया दिवशी अजय माझ्यावर चिडतो. पण मी लकी आहे की, अजयसह लोक मला माझ्या या स्वभावासाठी माफ करतात. कारण जे खरे आहे तेच मी बोलते. डिप्लोमॅटिक होणे माझ्यासाठी तरी कठीण आहे, असे काजोल म्हणाली.ALSO READ : करण जोहरसोबत काम करण्याच्या प्रश्नावर अखेर बोलली काजल...वाचा सविस्तरबॉलिवूड सेलिब्रिटी स्वत:सोबत अमानवीयपणे वागायला लागले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी नेहमी सुंदरच दिसावे, हे त्यांचे स्वत:चे क्रिएशन आहे. मला हे मान्य नाही. मी कायम मला आरामदायक वाटतात, तेच कपडे घालते. हे कुठले एअरपोर्ट फॅशन वा लूक नाही. सामान्य माणसं जसे वावरतात, हे ते आहे. साईज झिरो काय असते, हे तर मला अद्याप कळलेले नाही, असेही काजोल म्हणाली.