सहा सीटर प्रायव्हेट जेट खरेदी करणारा अजय देवगण पहिला अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 21:08 IST
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने नुकताच त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. २ एप्रिल १९६९ रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या अजयने ...
सहा सीटर प्रायव्हेट जेट खरेदी करणारा अजय देवगण पहिला अभिनेता?
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने नुकताच त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. २ एप्रिल १९६९ रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या अजयने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. अॅक्शन, कॉमेडी यांसह गंभीर भूमिका साकारून त्याने स्वत:ला इंडस्ट्रीत सिद्ध केले. मध्यंतरी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार अजय पहिला असा बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याने स्वत:चे सहा सीटर प्रायव्हेट जेट खरेदी केले. परंतु लगेचच त्याच्या प्रवक्त्याकडून या वृत्तास नकार दिला. मात्र या वृत्ताची कितपत सत्यता आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. रिपोर्ट्सनुसार ‘मसेराती क्वाट्रोपोर्टे’ कार खरेदी करणारा अजय देवगण पहिला भारतीय व्यक्ती आहे. अजयने ज्यावेळी मसेराती क्वाट्रोपोर्टे ही कार खरेदी केली, त्यावेळी तिची किंमत चार कोटी रुपये होती. १९९५ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर ‘करन-अर्जुन’मध्ये करणची भूमिका अगोदर अजयला आॅफर केली होती. परंतु काही कारणांमुळे त्याने त्या भूमिकेस नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी सलमान खानची वर्णी लागली. अजयची दिलीपकुमारसोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याने दिलीप साहबसोबत ‘असर : द इम्पेक्ट’ नावाचा चित्रपट करण्याचा प्लॅन केला होता. परंतु काही कारणामुळे हा चित्रपट सुरू करता आला नाही, ज्याचा अजूनही त्याला पश्चात्ताप होतो. अजयने त्याच्या डेब्यू चित्रपटात दोन मोटारसायकलवर एंट्री करून इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. पुढे २०१२ मध्ये ‘सन आॅफ सरदार’मध्ये चक्क घोड्यांवर हा स्टंट केला. फारच कमी लोकांना माहिती आहे की, अजय देवगणला अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक बनायचे होते. अजयने मीठी बाई कॉलेजमधून यामध्ये ग्रॅज्युएशनही केले. पुढे त्याने दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. याचदरम्यान, त्याची भेट कुकू कोहली यांच्यासोबत झाली. त्यावेळी ‘फूल और कांटे’ या चित्रपटाची निर्मिती केली जात होती. त्यांनी अजयला या चित्रपटासाठी लीड रोल आॅफर केला. या चित्रपटाने अजयला रातोरात सुपरस्टार केले.