‘एडीएचएम’मध्ये ऐश्वर्याचा रोल महत्त्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 10:46 IST
करण जोहरचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची चर्चा यामुळे जास्त आहे कारण ऐश्वर्या रॉय ...
‘एडीएचएम’मध्ये ऐश्वर्याचा रोल महत्त्वाचा
करण जोहरचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची चर्चा यामुळे जास्त आहे कारण ऐश्वर्या रॉय बच्चन यात असणार आहे. तिचा रोल हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, असे कळते आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर हे देखील असणार आहेत.ऐश्वर्याने जवळपास ३५ ते ४० दिवस चित्रपटाचे शूटींग केले आहे. त्यामुळे हा नक्कीच पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत नसणार! आत्तापर्यंत तिने कधीच साकारला नाही असा रोल ती या चित्रपटात साकारत आहे. करण जोहर दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन्स निर्मित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे.