Join us

 अब बोर हो गए...! असे काय झाले की ऐश्वर्या रायला पाहून चाहते कंटाळले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:46 IST

ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची प्रशंसा करताना लोक थकत नाही. पण...

ठळक मुद्देअलीकडच्या काळात ऐश्वर्या अनेक बड्या इव्हेंटमध्ये एकाच स्टाईलच्या गाऊनमध्ये दिसली.

ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची प्रशंसा करताना लोक थकत नाही.  सुंदर चेहराच नाही तर या चेह-यावरचे मनमोहक हास्य चाहत्यांना घायाळ करते. पण तरीही ऐश्वर्या अनेकदा ट्रोल होते. सोमवारी रिमा जैन (कपूर घराण्याची लेक) यांचा मुलगा अरमान जैनच्या लग्नात पोहोचली. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. पण ऐश्वर्याला पाहून चाहते काहीसे निराश झालेत.

 अरमानच्या लग्नात ऐश्वर्याने हेवी वर्कचा लॉन्ग गाऊन घातला होता. मोकळे केस, रेड लिपस्टिक असे तिचे लूक होते. अनेकांनी या लग्नातील ऐश्वर्याचे लूक पाहून ‘अब बोर हो गए...’, अशी प्रतिक्रिया दिली. होय, ऐश्वर्याचे सतत एकाच स्टाईलचे कपडे, तिची सेम हेअरस्टाईल, इतकेच काय तर सेम रेड कलरची लिपस्टिक पाहून लोकांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘प्रत्येक इव्हेंटमध्ये ऐश्वर्या अगदी एकाच प्रकारचे कपडे का घातले?,’ असा सवाल एका युजरने केला. तर अन्य एका युजरने, ‘हिला सतत एकाच लूकमध्ये पाहून कंटाळा आलाय,’असे लिहित ऐश्वर्याला ट्रोल केले.एका युजरने तर ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या हिच्या हेअरस्टाईलवरही कमेंट केली.

(दीपिका पादुकोण वेडिंग रिसेप्शन)

(सोनम कपूर वेडिंग रिसेप्शन)

अलीकडच्या काळात ऐश्वर्या अनेक बड्या इव्हेंटमध्ये एकाच स्टाईलच्या गाऊनमध्ये दिसली. अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पादुकोण या तिघींच्याही वेडिंग रिसेप्शनमध्ये ऐश्वर्या आॅफ व्हाईट आणि लाईट शेड्सच्या गाऊनमध्ये दिसली होती. नेहमीप्रमाणे तिचे केस मोकळे होते. साहजिकच ऐश्वर्याच्या स्टाईलला लोक कंटाळले असतील तर नवल नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन