‘फन्ने खां’ची रिलीज डेट बदलल्याने अनिल कपूरला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. कारण ‘फन्ने खां’सोबतच ‘रेस3’ या चित्रपटातही अनिल कपूर आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी बॉक्सआॅफिसवर धडकले असते तर अनिलने कुठल्या चित्रपटाचे प्रमोशन केले असते, असा प्रश्न होता. पण आता हा प्रश्नच बाद झाला आहे.
ALSO READ : अनिल कपूरला केस विंचरण्यासाठी लागले चक्क ५० तास, मग समोर आला असा लूक!
‘फन्ने खां’ची रिलीज डेट बदलणे, हे सलमानलाही दिलासा देणारी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईद म्हटले की सलमानचा चित्रपट, असे एक समीकरण झाले आहे. या मुहूर्तावर ‘फन्ने खां’ रिलीज झाला असता तर निश्चितपणे दोन्ही चित्रपटासांठी ते तोट्याचे ठरले असते. विशेषत: ‘फन्ने खां’ला ‘रेस3’च्या तुलनेत अधिक नुकसान सोसावे लागले असते. कारण ‘रेस3’ हा ‘फन्ने खां’पेक्षा सर्वअंगाने मोठा चित्रपट आहे. ‘रेस3’या बिग स्टारर, बिग बजेट चित्रपटासमोर ‘फन्ने खां’चा टिकाव लागणे तसेही जरा कठीण राहिले असते. त्यामुळे ‘फन्ने खां’च्या निर्मात्यांनी ऐकूनच योग्य निर्णय घेतला, असे मानले जात आहे.