Join us

​ ‘सलमान खान विरूद्ध ऐश्वर्या राय’ सामना अखेर रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 11:46 IST

२०१८च्या सुरूवातीलाच यंदाच्या ईदला सलमान खान विरूद्ध ऐश्वर्या राय असा सामना रंगणार, हे स्पष्ट झाले होते. होय, सलमानचा ‘रेस3’ ...

२०१८च्या सुरूवातीलाच यंदाच्या ईदला सलमान खान विरूद्ध ऐश्वर्या राय असा सामना रंगणार, हे स्पष्ट झाले होते. होय, सलमानचा ‘रेस3’ आणि ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फन्ने खां’ हे दोन्ही सिनेमे ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार असल्याचे सांगितले गेले होते. साहजिकच चाहतेही  बॉक्सआॅफिसवरचा हा संघर्ष पाहायला उत्सुक होते. पण आता एक ताजी बातमी आहे. होय, दोन्ही चित्रपटांचा बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टळला, असे स्पष्ट झाले आहे. ‘फन्ने खां’ प्रोड्यूस करणा-या क्रि-अर्ज एंटरटेनमेंटने आपल्या ताज्या tweetमध्ये ही माहिती दिली आहे. ऐश्वर्या राय बच्चनचा  ‘फन्ने खां’  येत्या १३ जुलैला रिलीज होणार असल्याचे या tweetमध्ये म्हटले आहे. राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित  ‘फन्ने खां’ या चित्रपटात ऐश्वर्यासोबतच अनिल कपूर व राजकुमार राव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘फन्ने खां’ची रिलीज डेट बदलल्याने अनिल कपूरला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. कारण  ‘फन्ने खां’सोबतच ‘रेस3’ या चित्रपटातही अनिल कपूर आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी बॉक्सआॅफिसवर धडकले असते तर अनिलने कुठल्या चित्रपटाचे प्रमोशन केले असते, असा प्रश्न होता. पण आता हा प्रश्नच बाद झाला आहे.ALSO READ : अनिल कपूरला केस विंचरण्यासाठी लागले चक्क ५० तास, मग समोर आला असा लूक!‘फन्ने खां’ची रिलीज डेट बदलणे, हे सलमानलाही दिलासा देणारी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईद म्हटले की सलमानचा चित्रपट, असे एक समीकरण झाले आहे. या मुहूर्तावर ‘फन्ने खां’ रिलीज झाला असता तर निश्चितपणे दोन्ही चित्रपटासांठी ते तोट्याचे ठरले असते. विशेषत:  ‘फन्ने खां’ला ‘रेस3’च्या तुलनेत अधिक नुकसान सोसावे लागले असते. कारण ‘रेस3’ हा  ‘फन्ने खां’पेक्षा सर्वअंगाने मोठा चित्रपट आहे. ‘रेस3’या बिग स्टारर, बिग बजेट चित्रपटासमोर  ‘फन्ने खां’चा टिकाव लागणे तसेही जरा कठीण राहिले असते. त्यामुळे  ‘फन्ने खां’च्या निर्मात्यांनी ऐकूनच योग्य निर्णय घेतला, असे मानले जात आहे.